रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील रेल्वे ट्रॅकवर जनशताब्दी रेल्वेची धडक बसून तरुणाचा मृत्यू
_रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील रेल्वे ट्रॅकवर रेल्वेची धडक बसून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 29 मार्च रोजी सकाळी 10.49 ते 10.55 वा. सुमारास घडली आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.हितेश काशिनाथ कांबळे (40,रा.उमरे,रत्नागिरी) असे रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी उमरे येथील रेल्वे ट्रॅकवर तेथील ट्रॅकमनला एक तरुण गंभिर जखमी अवस्थेत दिसून आला. त्याने तातडीने याची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यानीं त्याला तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिसांनी याबाबत तपास केल्यावर तो त्या तरुणाचे नाव हितेश कांबळी असल्याी माहिती मिळाली. तसेच त्याला मुंबई ते मडगाव जाणारी जनशताब्दी एक्सप्रेसची धडक बसल्याने त्यात तो गंभिर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.www.konkantoday.com