भारतीय जनता पार्टीच्या भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा निलेश आखाडे यांची नियुक्ती
*.. *रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निलेश आखाडे हे गेली अनेक वर्ष कार्यरत असून भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी या आधी काम पाहिले होते. त्यानंतर नव्या कार्यकरणी मध्ये त्यांना आयटी जिल्हा संयोजक पद देण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यामधील भटक्या विमुक्तांचे प्रश्न निलेश आखाडे हे गेले अनेक वर्ष मांडत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश आखाडे यांना पुन्हा एकदा नव्याने भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे. यावेळी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री आनंद गोसावी, प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी कासेकर, लोकसभा प्रभारी प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, बाळासाहेब माने, उल्का विश्वासराव, प्रमोद अधटराव, सतेज नलावडे, अशोक मयेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व स्तरातून नीलेश आखाडे यांचे अभिनंदन होत आहे. भटके विमुक्त जाती जमातींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध योजना यांचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात वाड्या वसाहतींना भेटी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी मोहीम हाती घेणार असल्याचे निलेश आखाडे यांनी सांगितले.