रेल्वेतून हातोहात मोबाईल पळवला
__कोकण रेल्वेमार्गावर रेल्वेतून प्रवास करताना गाडीच्या दरवाजात उभे राहून मोबाईल पाहत असलेल्या एका प्रवाशाच्या हातावर अज्ञात इसमाने काहीतरी मारले.त्यामुळे हातातून खाली पडलेला मोबाईल चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील साखळोली येथील अजित सुरेश गोवळकर हे २२ मार्चला दिवा रत्नागिरी पॅसेंजरने येत होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमरास या ट्रेनने पनवेल स्थानक सोडले. ते दरवाजामध्ये मोबाईल घेऊन उभे असताना रेल्वेट्रॅकवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या हातावर काहीतरी मारल्यावर त्यांचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल गाडीच्या खाली पडला. त्या इसमाने तो उचलून तेथून पलायन केले,www.konkantoday.com