भरणे उड्डाण पुलाच्या भिंतीवर रेखाटलेल्या कलाकृतींनी प्रवाशांचे लक्ष वेधले
कोकणाला अदभूत निसर्गाची देणगी लाभली आहे. प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक गडकिल्ल्यांसह कोकणातील मराठमोळी संस्कृती सार्यांनाच आकर्षित करते. भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणच्या उड्डाण पुलाखालील दोन्ही बाजूच्या भिंतीवर रेखाटलेल्या कलाकृतींच्या रंगसंगतीची सार्यांनाच भुरळ पडत आहे. मराठमोळ्या संस्कृतीसह गडकिल्ल्यांचेही दर्शन होत असल्याने येणार्या जाणार्यांची पावले आपसुकच तेथे थबकत आहे. या रंगसंगतीच्या कुंचल्याने भिंती बोलक्या झाल्या आहेत.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात खवटी ते परशुराम घाटापर्यंतच्या ४४ कि.मी.च्या खेड टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम जवळपाास पूर्ण झाले आहे. भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी उभारलेला उड्डाणपुलही वाहतुकीसाठी खुला झायाने गुंतागुंतीची वाहतूक सुरळीत झाली आहे. येथून चारही दिशांना पादचार्यांसह वाहनचालकांची वर्दळ सुरू असते. याचमुळे मध्यवर्ती ठिकाण रेलचेलीने नेहमीच गजबजलेले असते.याच मध्यवर्ती ठिकाणच्या उड्डाणपुलाखालील दोन्ही बाजूच्या भिंतीना विविध कलाकृतींच्या रंगछटांचा साज देण्यात आल्याने भिंती अक्षरशः बोलक्या झाल्या आहेत. कोकणाने मराठमोळी संस्कृती कायम जपली आहे. याच मराठमोळ्या संस्कृती जोपासणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यात विविध प्रकारच्या रंगसंगती असल्याने सार्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्यांची हुबेहुब रेखाटलेल्या कलाकृतींची शालेय विद्यार्थ्यांसह चिमुरड्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. www.konkantoday.com