डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आवर घाला, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांची मागणी
चिपळूण शहर परिसरात सार्वजनिक तसेच खाजगी जागेत काही ठिकाणी स्पीकर लावले जातात. या स्पीकर्सचा आवाज ठराविक डेसिबल्स पर्यंत सहन होवू शकतो. परंतु सध्या या आवाजामध्ये डीजे नामक अत्यंत कर्णकर्कश आवाजाने सर्वत्र उच्छाद मांडला असून त्याचे नागरिकांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत आहेत. त्यामुळे अत्यंत आवाजी डीजेला प्रतिबंध करावा, अशी मागणी चिपळुणातील सामाजिक कार्यकर्ते, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनी चिपळूण पोलिसांकडे केली आहे.www.konkantoday.com