राऊतांनी ‘वंचित’च्या पाठीत खंजीर खुपसला!! प्रकाश आंबेडकर संतप्त
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. ‘संजय राऊत किती खोटं बोलाल?’ अशा आशयाची एक्स पोस्ट करून आंबेडकरांनी प्रश्नांचा भडीमार केला असून राऊत यांनी वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोपही केला आहे. यासोबत पाठीत सुरा खुपसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो देखील आंबेडकरांनी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सुरा खुपसलेल्या व्यक्तीवर वंचित तर हल्ला करणाऱ्या हातावर संजय राऊत असे लिहीलेलं आहे.*आंबेडकरांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘संजय राऊत किती खोटं बोलणार? तुमचे आणि माझे विचार सारखेच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितला आमंत्रण न देता आजही बैठक का घेत आहात? सहयोगी असून तुम्ही पाठीवर खंजीर खुपसला आहे! सिल्व्हर ओक्स इथल्या मीटिंगमध्ये तुमचे वागणं कसं होतं हे आम्हाला माहीत आहे. अकोल्यात वंचितच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा मुद्दासुद्धा तुम्ही उपस्थित केला हे खरे नाही का? तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एकीकडे तुम्ही युतीचा आभास दाखवत आहात तर दुसरीकडे आम्हाला पाडण्याचे कट कारस्थान करत आहात. हे तुमचे विचार आहेत?,’ असे संतप्त सवाल विचारण्यात आले आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीने वंचितला चार जागा देऊ केल्या होत्या, मात्र प्रकाश आंबेडकर जास्त जागांची मागणी करत होते. अखेर ही चर्चा निष्फळ ठरली. ज्यानंतर आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार नाही अशी घोषणा केली आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः अकोल्यातून निवडणूक लढवणार आहेत.संजय, कितना झूठ बोलोगे!?अगर आपके और हमारे विचार एक हैं तो हमें बुलाते क्यों नहीं हैं मीटिंग में?6 मार्च की फोर सीजन्स होटल मैं हुई बैठक के बाद आपने हमारे किसी प्रतिनिधि को आमंत्रित क्यों नहीं किया?आज भी आप वंचित को आमंत्रित किए बिना क्यों बैठक कर रहे है?www.konkantoday.com