नफ्यामधील ९.६१% वाढीसह स्वरूपानंद पतसंस्थेचे २०२४ अखेरचे आर्थिक रिझल्टस उत्तम – ॲड. दीपक पटवर्धन
वर्ष अखेरीला केवळ दोन दिवस शिल्लक असताना स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या वार्षिक अर्थकारणाचा आढावा घेतला असता संस्थेच आर्थिक सौष्ठव अधिक बलशाली झाल्याचे निदर्शनास येते.गतवर्षीच्या तुलनेत ९.६१% एवढी निव्वळ नफ्यात वाढ होईल, तर गतवर्षीच्या तुलनेत कर्जात १७.३९% वाढ संस्थेने नोंदवली असून, ठेवीमध्येही १५.०६% एवढी वाढ नोंदली गेली आहे. संस्थेच्या विविध प्रकारच्या रिझर्वमध्ये १६% एवढी विक्रमी वाढ झालेली दिसते. संस्थेच्या गुंतवणूका ह्या ८.४२% नी वाढल्या आहेत.संपूर्ण आर्थिक वर्षात पतसंस्थेचे व्यवहार सातत्याने वाढते राहिले असून CRAR चे प्रमाणे २३% पेक्षा अधिक राहणार आहे.माहे जुलै २०२३ या महिन्यात वर्षभरातील सर्वात अधिक ठेवी संस्थेकडे जमा झाल्या. जुलै २०२३ मध्ये ११ कोटींपेक्षा अधिक मुदत ठेवी संस्थेकडे संकलित झाल्या. सप्टेंबर २०२३ मध्ये वर्षातील सर्वात अधिक कर्ज वितरण संस्थेने केले. सप्टेंबर २०२३ या एका महिन्यात ४ कोटी ४४ लाखांचे कर्ज वितरण झाले. जून २०२३ या महिन्यात सर्वात अधिक २१ कोटी ६५ लाखांचे सोनेतारण कर्ज वितरीत करण्यात आले.१ लाखापर्यंतचे ६० कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले, तर ३ ते ५ लाख या गटात १२ कोटी ८१ लाखांचे कर्ज वितरण झाले, १० ते २५ या गटात ९ कोटी ६१ लाखांचे कर्ज वितरण झाले, २५ लाख ते १ कोटी या गटात १४ कोटींच्या घरात कर्ज वितरण करण्यात आले.मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरीत करताना वसुलीचे महत्व जपत २८ तारखेअखेर ९९.४४% वसुली पूर्ण झाली असून उर्वरित दोन दिवसात यात अधिक वाढ होईल हा विश्वास ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.४५ हजार सभासदांचा विश्वास आणि सहकार्य यामुळेच स्वरूपानंद पतसंस्थेची अर्थ मार्गक्रमणा शानदार पद्धतीने मार्गस्त आहे. व्रतस्त रहात सहकाराचे मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. असे भावपूर्ण प्रतिपादन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.www.konkantoday.com