दापोलीतील कलाकार चमकलेला ‘जन्मऋण’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित
कांचन अधिकारी दिग्दर्शित आणि निर्मित ‘जन्मऋण’ या मराठी चित्रपटात दापोलीतील गुणी कलाकार चमकले आहेत. नुकताच महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आई-वडील आणि मुलाच्या नात्यातील सत्य घटनेवर आधारित असलेला कौटुंबिक जिव्हाळा तसेच सामाजिक संदेश देणारा गणेश फिल्म आणि श्री अधिकारी ब्रदर्स प्रस्तूत कांचन अधिकारी दिग्दर्शित चित्रपट “जन्म ऋण” नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण हे दापोली शहर तसेच निसर्गरम्य आसूद, हर्णै आदी ठिकाणी झालेले आहे.या चित्रपटात मनोज जोशी, सुकन्या मोने, तुषार कावळे, अनघा अतुल, सुशांत शेलार यांच्यासह दापोलीमधील शशी पेंडसे, विराज जोशी, कपिल पेंडसे, प्रज्ञा करंदीकर, प्रसाद कर्वे, संदीप राजपुरे आणि सिद्धेश शिगवण हे कलाकार रूपेरी पडद्यावर झळकले आहेत.www.konkantoday.com