कोकण रेल्वे मार्गे धावणारी पोरबंदर ते कोचुवेली एक्सप्रेस ही गाडी आता नव्या रंग रूपात एलएचबी रेकसह धावणार
_भारतीय रेल्वेने जुन्या गाड्यांच्या ठिकाणी एलएचबी तंत्रज्ञानाने बनवलेल्या नवीन गाड्या देशभरातील सर्वच रेल्वे मार्गांवर चालवण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी पोरबंदर ते कोचुवेली एक्सप्रेस ही गाडी आता नव्या रंग रूपात एलएचबी रेकसह धावणार आहे.कोकण रेल्वे मार्गे धावणारी पोरबंदर ते कोचुवेली (२०९१०/२०९०९) ही गाडी आतापर्यंत आय आर एस रेकसह धावत होती. मात्र आता ती नवीन एल एच बी तंत्रज्ञानाने बनवलेली अत्याधुनिक बनणार आहे. एल एच बी श्रेणीतील ही गाडी दिनांक २८ मार्च २०२४ च्या फेरीपासून प्रत्यक्ष धावू लागणार आहे.रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली या मार्गावर दिनांक २८ मार्चपासून तर कोचुवेली ते पोरबंदर या प्रवासात ती . ३१ मार्च २०२४ च्या फेरीपासून एल एच बी. रेकसह धावणार आहे. जुन्या आय आर एस रेक सह धावताना ही गाडी २३ डब्यांची होती. मात्र नव्या रूंगरूपात म्हणजे एलएचबी रेकसह धावताना ती २२ डब्यांची होणार आहे.www.konkantoday.com