अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने रत्नागिरीत बुधवारी रंगभूमी दिन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्यावतीने दि. २७ मार्चला जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात येणार आहे. एकपात्री अभिनय, नाट्यछटा, गीतगायन, कराओके गीत सादरीकरण, अभिवाचन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून दोन ज्येष्ठ रंगकर्मींचा नाट्य परिषदेच्यावतीने सन्मान केला जाणार आहे. कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी वामन कदम ९४२२६३८१८६, आसावरी शेट्ये ७५०७४१६१६६, सनातन रेडीज ९१५८५४३६७८ या मोबाईल क्रमांकावर नाव नोंदणी करण्याचे आवाहन नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे. www.konkantoday.com