
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद जवान स्मारकामध्येस्मृतिस्थळाचे लोकार्पण
_देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद जवान स्मारकामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ६६ शूर हुतात्मा सैनिकांची नावे असलेले स्मृतिस्थळ लोकार्पण सोहळा उत्साहात झाला. लेफ्टनंट जनरल डॉ. निंभोरकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन व मानवंदना देऊन स्मृतिस्थळाचे लोकार्पण केले.लोकार्पण सोहळ्याला निवृत्त लेफ्टनंट जनरल विश्वास भट, बालाकोट एअर स्ट्राइकचे रचनाकार निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. राजेंद्र निंभोरकर, निवृत्त कॅप्टन यशवंत कदम, वीर पत्नी सुनंदा महाडिक, माजी सैनिक अमर चाळके, सदानंद भागवत, कृष्णकुमार भोसले आणि शिरीष फाटक उपस्थित होते. माटे-भोजने सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला.संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी शिक्षणसंस्थांची जबाबदारी फक्त लौकिक शिक्षण देण्याची नसून त्याचबरोबर राष्ट्रमूल्य, राष्ट्रविचार, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचे शिक्षणही देणे असल्याचे सांगितले. माजी सैनिक अमर चाळके यांनी सैन्यदल व तरुणांसाठी अग्निवीर योजना हितावह असल्याचे नमूद करताना इतर देशातील सक्तीच्या सैनिक प्रशिक्षणाबाबतची माहिती सांगितली. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांच्यावतीने प्रशांत थोरात यांनी संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळातील विविध शैक्षणिक आस्थापनांमधील विद्यार्थ्यांनी संकलित केलेला सैनिक कल्याण निधीचा धनादेश संस्थाध्यक्ष भागवत यांनी लेफ्टनंट जनरल विश्वास भट यांच्याकडे सुपूर्द केला.www.konkantoday.com




