पावस बसस्थानक लवकरच सुसज्ज होणार
रत्नागरी तालुक्यातील सर्व बसस्थानकं सुसज्ज करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. तालुक्यातील सर्वात महत्वाचे असे पावस येथील बसस्थानकही सुसज्ज करण्यासाठी एमआयडीसी अंतर्गत दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पावस बसस्थानक सुसज्ज होणार आहे.पावस येथील देशमुख यांनी जागा दिल्यानंतर भाडेतत्त्वावर पावस येथील बसस्थानक सुरू करण्यात आले आहे. काही काळात किरकोळ दुरुस्ती करून बसस्थानक तयार करण्यात आले. या परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले सुसज्ज बसस्थानक व्हावे, अशी अनेक वर्ष मागणी होती तसेच रत्नागिरी, राजापूर या सागरी महामार्गावरील महत्वाचे ठिकाण असल्यामुळे येथे प्रवाशांचा राबता अधिक असतो. त्याचबरोबर पावस हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने बसस्थानकाच्या नुतनीकरणाची मागणी करण्यात आली होती. या बसस्थानकामधून दिवसभरात एसटीच्या दीडशेपेक्षा अधिक फेऱ्या होत असतात. ग्रामीण भागात जाणारा वर्ग मोठ्या प्रमाणात याच बसस्थानकात येत असतो. या बसस्थानकाच्या नुतनीकरणाकरिता एमआयडीसी अंतर्गत दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसात बसस्थानकाचे नुतनीकरणाचे काम सुरू होण्याची शक्यता आहेwww.konkantoday.vom