कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी
_आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आज ५ वी यादी जाहीर करण्यात आली आहे. १११ उमेदवारांच्या यादीत भाजपााने कंगणा रणौतलाही उमेदवारी दिली असून नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या उद्योजक नवीन जिंदाल यांनाही हरयाणातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे.कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता कॉन्ट्रावर्सी क्वीन कंगनाही भाजपासाठी मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.लोकसभा निवडणुकांसाठी अब की बार, ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाने १११ उमेदवारांची ५ वी यादी जाहीर केली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.www.konkantoday.com