महादेव जानकर महायुतीत
_महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे महादेव जानकर महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढतील, अशी चर्चा होती. या सर्व चर्चांनंतर आता राजकारणात ट्विस्ट आणणारी घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. तसेच अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. यावेळी महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक सुरु असताना सुनील तटकरे आणि महादेव जानकर वर्षा बंगल्याच्या बाहेर आले. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com