आगीच्या वाढत्या घटनांसह वणव्यात होरपळतेय खेड,कोळसा मिळवण्याच्या उद्देशाने काही ठिकाणी वणवा
ग्रामीण भागात विशेषतः डोंगराळ भागात काटेरी वनस्पती नष्ट करण्यासह कोळसा मिळवण्याच्या उद्देशाने काही ठिकाणी वणवा लावला जातो. याच वणव्याची ठिणगी पडून जंगलमय भागात वणवे पेटत आहेत. याची झळ जंगलातील छोट्या मोठ्या वृक्षांपाठोपाठ शेतकर्यांनी भाजावळीसाठी गोळा केलेल्या फौजफाट्यालाही बसत असल्याने शेतकरी चिंतेच्या सावटाखाली आहेत. गेल्या ३ महिन्यात जंगलमय भागात लागलेल्या ९ भीषण वण्यात वनसंपदेची राखरांगोळी झाली आहे. आगीत एका घरासह ३ गोठे व ४ दुकाने भस्मसात झाली. ट्रकसह टेम्पोही पेटल्याची नोंद आहे. www.konkantoday.com