कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा आता रविवारी 31 मार्च रोजी होणार 30 मार्च रोजी रंगपंचमी असल्याने मेळावा तारखेत केला बदल, मेळावा ३१ मार्चला होणार
* . . रत्नागिरी (प्रतिनिधी) : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा शनिवार दिनांक 30 मार्च रोजी रंगपंचमी असल्याने शनिवार ऐवजी रविवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी सायंकाळी चार वाजता ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये संपन्न होईल. यावेळी मार्च महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात येईल. तरी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मेळाव्याच्या तारखेत झालेल्या बदलाची नोंद घेऊन या मेळाव्याला ३१ मार्च रोजी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री मारुती अंबरे यांनी केले आहे.