
राष्ट्रीय स्तरावरील आयोजित ई-बाजा २०२४ या स्पर्धेत फिनोलेक्सची क्वाड बाईक ठरली लक्षवेधी
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एस.ए.ई.) इंडियाने राष्ट्रीय स्तरावरील आयोजित ई-बाजा २०२४ या स्पर्धेत दाखल केलेली इलेक्ट्रीक ऑल टेरेन व्हेईकल्स (एटीव्ही) लक्षवेधी ठरली.ही स्पर्धा तेलगंणा येथे बी. व्ही. राजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉॉजी संस्थेत आयोजित केली होती. देशभरातील विविध संस्थांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.फिनोलेक्स ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः इलेक्ट्रीक ऑल-टेरेन व्हेईकल्स (एटीव्ही) बनवून ई-बाजा २०२४ या चॅम्पियनशीप स्पर्धेत आापला सहभाग नोंदवला होता. बी. एस. रमेश (हेड ऑफ ऍकॅडेमिक इनीशीएटिव्ह, एएलटीएआयआर) यांनी फिनोलेक्स ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रीक एटीवव्ही वेईकलच्या डिझाईनमधील नावीन्यपूर्णतेचे व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. झीशान वाडकर याने या क्षेत्रातील त्यांचे कौशल्य आणि ज्ञान प्रदर्शित करून बाजा ऍप्टिट्यूड टेस्ट उत्तीर्ण केली. त्यानंतर वाडकर यांची डीईपी मेशवर्क कंपनीने पुढील फेरीसाठी निवड केली आहे.फिनोलेक्स ऍकॅडमीच्या १८ विद्यार्थ्यांच्य टीमने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तसेच प्रा. प्रसाद जे. कदम यांचा सल्लागार प्राध्यापक म्हणून समावेश होता. www.konkantoday.com