
चिपळूण शहरातील भाजी मंडईचे मुख्य प्रवेशद्वार बाजारपेठेकडे करा
चिपळूण तालुक्यातील भाजी मंडईतील गाळे ३० वर्षाच्या करारावर देण्याचा झालेला निर्णय स्वागतार्ह आहे मात्र याच मंडईचे प्रवेशद्वार जाणुनबुजून मागील बाजूला करण्यात आले आहे. ते बाजारपेठेच्या बाजूने करावे. अन्य नसलेल्या सुविधा उपलब्ध कराव्यात, त्यानंतरच याच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याबाबत भाजी व्यावसायियक विचार करतील, असे मत ज्येष्ठ व्यावसायिक सुधीर शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.या पत्रकात म्हटले आहे की पूर्वीच्या महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडईचे प्रवेशद्वार बाजारपेठेच्या बाजूने होते. त्यावेळी गरज नसतानाही ती भाजी मंडई तोडण्यात आली. त्याला आम्ही सर्व भाजी व्यावसायिकांनी विरोध केला होता. तरर नव्या मंडईचे प्रवेशद्वार पूर्वीप्रमाणे समोरूनच असावे अशी मागणीही केली होती. मात्र काही राजकारण्यांनी भाजी व्यावसायिकांचे नुकसान करण्यासाठी तिथे प्रवेशद्वार मागील बाजूला केले. www.konkantoday.com