चिपळुणातील उड्डाणपुलाला सुरूवात नाही मात्र सर्व्हिस रोडचे काम सुरू
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणातील सर्वाधिक लांबीच्या व शहरात उभारल्या जात असलेल्या उड्डाणपुलाचे नवे डिझाईन अजूनही अंतिम झालेले नाही. त्यामुळे भविष्यात या पुलाचे काम दीर्घकाळ रखडणार, हे लक्षात घेवून आता सध्याच्या कॉंक्रीटीकरण झालेल्या सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूला आणखी दीड मीटने रूंद केला जाणार आहे. या दीड मीटरमध्ये पेवरब्लॉक बसवण्यात येणार असून त्या कामाला सुरूवात झाली आहे.महामार्गाच्या चिपळूण टप्प्यात येत असलेल्या या पुलाचा काही भाग गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कोसळला. त्यातच चौकशी व बांधकामातील त्रुटी तपासून आता या पुलाचे डिझाईन बदलण्यात येणार आहे. मात्र पूल दुर्घटना घडून ५ महिन्यांचा कालावधी उलटा तरीही नव्याने तयार करण्ययात आलेल्या डिझाईनला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. ती कधी मिळेल हेही कुणी सांगत नाही. शिवाय डिझाईन बदलल्यानंतर पुन्हा काम वाढणार असून काही बदलही केले जाणार आहेत.www.konkantoday.com