दापोली नगरपंचायतीने पाणीपट्टी न भरणारर्या ११ नळजोडण्या तोडल्या
दापोली नगरपंचायतीने नळपाणी थकित पाणीपट्टीधारकांना आवाहन करूनही पाणीपट्टी न भरणार्या ११ जणांवर नळजोडण्या तोडण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, नगरपंचायतीने थकित पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र केली असून आतापर्यंत ५५ टक्के पाणीपट्टी वसुली करण्यात आली आहे.थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर काहीजणांनी पाणीपट्टी नगरपंचायतीमध्ये येवून भरली. तर काहीजणांनी वारवार सूचना देवूनही न भरल्याने आतापर्यंत ११ नागरिकांच्या पाणी जोडण्या तोड्यात आल्या आहेत. www.konkantoday.com