भारताच्या कृषी प्रगतीत विद्यापीठांची भूमिका महत्वाची -राज्यपाल रमेश बैस
पुढील काही वर्षात भारताला जगातील दिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य पंतप्रधानांनी निर्धारित केल्याने कृषीला महत्वपूर्ण भूमिका निभवावी लागेल. कृषी विभागामुळे देश विकसित भारताला कृषीक्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यास आणि जगाचे अन्नकेंद्र म्हणून उदयास येण्यास त्यांची भूमिका महत्वाची ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४३ वा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहात पार पडला. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना बैस बोलत होते.www.konkantoday.com