महाराष्ट्र खो-खो संघात पायल पवार व अपेक्षा सुतार यांची निवड
भारतीय खो-खो महासंघाच्यावतीने दिल्ली येथे २८ मार्च ते ०१ एप्रिल या कालावधीत ५६ व्या पुरूष महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे सरचिटणीस ऍड. गोविंद शर्मा यांनी महाराष्ट्राचे संघ जाहीर केले आहेत. राज्य महिला संघात रत्नागिरीच्या पायल पवार व अपेक्षा सुतार यांची निवड झाली आहे. या संघास महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरूण देशमुख यांनी शुभेच्छघ दिल्या. www.konkantoday.com