पाण्याची पातळी कमी झाली, राजापूर शहरवासियांना आता दिवसाआड पाणीपुरवठा
वाढत्या तापमानामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होवू लागली आहे. त्यामुळे राजापूर शहराला नैसगिकदृष्ट्या पाणीपुरवठा करणार्या कोदवली धरणातील पाणीसाठाही खालावला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे पाऊस सुरू होईपर्यंत नियोजन करून नगर परिषद प्रशासनाला शहरवासियांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. याचाच एक भाग म्हणून राजापूर नगर परिषद प्रशासनाने आता एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार २० मार्चपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. www.konkantoday.com.