लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर कलादालनात कै. जनुभाऊ निमकर यांच्या तैलचित्राचे अनावरण
*लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर कलादालनात कै. जनुभाऊ निमकर यांच्या तैलचित्राचे अनावरण* चिपळूण येथील सुप्रसिध्द सदैव वर्धिष्णू असणारे कोकणातले सांस्कृतिक केंद्र लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण येथे कलादालनात संगीतसूर्य केशवराव भोसले यांना ज्यांनी रंगभूमीवर आणले ते स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीचे मालक व दिग्दर्शक स्व. जनुभाऊ निमकर या अपरान्त पुत्राच्या तैलचित्राचे अनावरण उद्या सोमवार दिनांक १८ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता संस्थेचे बाळशास्त्री जांभेकर सभागृह येथे जागतिक देवरुखे ज्ञाती मंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर मुंबई, प्रख्यात अभिनेत्री संपदा जोगळेकर कुळकर्णी, पत्रकार अरविंद कोकजे, विद्यार्थी सहाय्यक संस्थेचे कार्यकर्ते माधवराव भोळे मुंबई, माजी नगरसेवक व श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री उमेश कुळकर्णी, नामवंत चित्रकार श्री गणेश कळसकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. हे तैलचित्र म्हणजे चित्रकलेतील विलक्षण अविष्कार असून ते पाहण्यास व या कार्यक्रमास सर्व साहित्य व कलाप्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष यतीन जाधव कार्यवाह विनायक ओक लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर यांच्यावतीने व ग्रामीण देवरुखे ब्राह्मण संघ चिपळूण अध्यक्ष श्री सुरेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे.