आ. राजन साळवी यांची महावितरण कंत्राटी कामगारांच्या उपोषणाला भेट
महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या वेतनवढ, रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार इत्यादी सतरा मागण्यांसाठी रत्नागिरी येथे महावितरण कार्यालयासमोर कर्मचार्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले तथा आ. राजन साळवी यांनी भेट देवून कर्मचार्यांची बाजू ऐकून घेतली व तत्काळ कार्यालयात जावून अधिकार्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर अधिकार्यांसमवेत कर्मचार्यांची भेट घालून आंदोलनात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला. तसेच कर्मचार्यांची बाजू, राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या माध्यमातून सोडवण्याचे अभिवचन दिले.www.konkantoday.com