
निवडणूक आयुक्त नियुक्तीचा वाद : सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर १५ मार्च रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शविली. भारताच्या सरन्यायाधीशांना मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमधून वगळण्यात आले आहे. सुदृढ लोकशाहीसाठी आयोगाला ‘राजकारण आणि कार्यकारी हस्तक्षेप’ यापासून दूर ठेवण्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस होकार दिला आहे.न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वकील प्रशांत भूषण, एनजीओ, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉम्र्स या संस्थेतर्फे सादर केलेल्या निवेदनाची दखल घेतली, त्यांनी याचिकेची तात्काळ यादी करण्याची मागणी केली आणि सांगितले की ते शुक्रवारी सूचीबद्ध केले जाईल.www.konkantoday.com