धामापूर ते संगमेश्वर यांचे विभाजन करून शिवधामापूर नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणार
संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत धामापूर ते संगमेश्वर यांचे विभाजन करून शिवधामापूर नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत होणे अत्यंत महत्वाचे होते. सदर गावांची ग्रामपंचायत एकच असल्याने व एका बाजूला असल्याने शिवधामापूर गावातील ग्रामस्थांना २० ते २२ कि.मी. अंतर होते. यामुळे ग्रामस्थांना कार्यालयीन कामे करणे खूप अडचणीचे व त्रासदायक ठरत होते.शिवधामापूर ग्रामस्थांनी याबाबत आमदार शेखर निकम यांच्याकडे निवेदन सादर करत आपल्या अडचणी मांडल्या व सदर ग्रामपंचायत स्वतंत्र होण्याबाबत सतत मागणी करत होते. निकम यांनी लोकांच्या अडचणी लक्षात घेवून सदर ग्रामपंचायत स्वतंत्र होण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला विभागीय कोकण आयुक्त यांच्याकडे सादर करण्यास सांगितले. मात्र त्यावेळी कोविडचा प्रादुर्भाव झाल्याने शासकीय कामकाज बंद असल्याने हे काम सुद्धा स्थगित राहिले. मात्र सदर प्रस्ताव हा शासकीय कार्यालयाकडे वेळेत पोच झाला होता. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सदर प्रस्ताव नव्याने सादर करत ग्रामस्थ व आमदार शेखर निकम यांनी सतत पाठपुरावा चालू ठेवला.www.konkantoday.com