रामदासभाई कदम भाजपाला दोषारोप लावायचे काम करू नका, माजी आमदार विनय नातू यांनी कदमांना सुनावले
केंद्र व राज्यात आपण युती म्हणून एकत्र आहोत. सन २००९ च्या गुहागर विधानसभेच्या निवडणुकीतील प्रकारानंतर पुलाखालून भरपूर पाणी गेले आहे. यामुळे आता आपण एकत्र राहिलो तर युतीचे सर्व उमेदवार आपण विजयी करू, यामुळे आदरणीय रामदासभाई भारतीय जनता पार्टी करता दोषारोप लावायचं कोणते काम करू नका, असे आवाहन भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले आहे.खेड, लोटे येथील सभांमधून शिवसेना नेते रामदास कदम यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातील मागील राजकारण व दापोली मतदार संघाविषयी सुरू असलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपावर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी कदम यांना मागील सर्व गोष्टींचा उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.www.konkantoday.com