रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी भरीव तरतूद
जिल्हा परिषदेत यंदा दुसर्यांदा पदाधिकार्यांविना सन २०२४-२४ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी व विद्यार्थीवर्गांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.सन २०२३-२४ च्या एकत्रित महसूल, भांडवल व वित्तप्रेषणासह रक्कम रूपये ४० कोटी ८१ लाख ८५.८०१ रुपयेचे अंतिम सुधारित अंदाजपत्रकाला व सन २०२४-२५ च्या एकत्रित महसूल, भांडवल व वित्तप्रेषणासह रक्कम रूपये २६ कोटी १० लाख ९७.७३९ रु. चे मूळ अंदाजपत्रकाला जिल्हा परिषदेने मंजूरी दिली.हे अंदाजपत्रक सोमवारी जिल्हा परिषदेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात सादर करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी हे अंदाजपत्रक सादर केले होते. यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, मुख्य व लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व खातेप्रमुख, अधिकारी तसेच वित्त विभागांतर्गत अर्थसंकल्प शाखांतील अधिकारी उपस्थित होते..www.konkantoday.com