
मुरडव येथे विहिरीत पडला गवा, वनविभाग व ग्रामस्थांनी गवा रेड्याची केली सुखरूप सुटका
संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथे विहिरीत पडलेल्या गवा रेड्याची वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने सोमवारी सुखरूप सुटका केली. मुरडव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीत गवा रेडा पडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यानुसार वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. विहिरीमध्ये ४ फुटा पर्यंत पाणी होते. जेसीबीच्या सहाय्याने विहीर एका बाजूने खोदून रस्ता तयार करून गव्याची विहिरीतून सुखरूप सुटका झाली. बचाव पथकामध्ये परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक आकाश कडुकर, अरुण माळी, गावचे सरपंच नितीन मेने, पोलीस पाटील राजू मेने व ग्रामस्थ सहभागी झाले होते. बचाव पथकास विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वन्यजीव रक्षक निलेश बापट यांचे मार्गदर्शन लाभले.www.konkantoday.com