गोवळकोट, पेठमाप व अर्ध्या शहराचा पाणीप्रश्न गंभीर, पाणीप्रश्नात पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
गोवळकोटसह गोवळकोट, पेठमाप व अर्ध्या शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे यात पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम यांनी लक्ष घालून त्यासाठी आवश्यक असणारा साडेसात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षापासून गोवळकोटसह अर्ध्या शहराला पाणीपुरवठा करणारी गोवळकोट येथील वाशिष्ठी नदीतील जॅकवेल समस्यांच्या गर्तेत अडकली आहे. त्यामुळे आम्हाला कायम मचूळ खारट व गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या त्रासाला आता नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी नगर परिषदेवर धडक देत थाळीनाद आंदोलन केले. त्यानंतर मुख्याधिकारी विशाल भोसले व अन्य अधिकार्यांनी हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी दोन प्रस्ताव तयार केले आहेत. त्यानुसार गांधारेश्वर येेथे जॅकवेल झाल्यास कायमचा पाणीप्रश्न सुटणार आहे. यासाठी ९ ते १० कोटी खर्च येणार आहे.www.konkantoday.com