आता चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने नव्हे तर तर चक्क चार बैल चोरून नेले
आता चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने नव्हे तर तर चक्क चार बैल चोरून नेण्याचा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडला आहेदापोली तालुक्यातील केळशी फाटा येथून अज्ञाताने तांबड्या रंगाचे चार मोठे बैल चोरुन नेले. ही घटना शनिवार 2 मार्च रोजी सकाळी 11.30 ते रविवार 3 मार्च रोजी पहाटे 4 वा.कालावधीत घडली आहे.याप्रकरणी रमेश सखाराम बोथरे यांनी बाणकोट पोलिस ठाण्यात सोमवारी 11 मार्च रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार,त्यांचे तांबड्या रंगाचे मध्यम शिंगांचे प्रत्येकी 5 हजार प्रमाणे 20 हजार रुपयांचे 4 बैल अज्ञाताने 2 ते 3 मार्च या दोन दिवसांच्या कालावधीत चोरुन नेले आहेत. आपले बैल मिळत नसल्याने त्यांनी आजुबाजुला शोध घेउन अखेर 11 मार्च रोजी बाणकोट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com