फेसबुकवर झालेल्या ओळखीतून घटस्फोटीत महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
फेसबुकवर झालेल्या ओळखीतून घटस्फोटीत महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी गोड गोड बोलून त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून व आपल्या घरी बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यानंतर लग्नास नकार दिल्या प्रकरणी संबंधित घटस्फोटीत महिलेने लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी साटवली भंडारवाडी येथील स्वप्निल रवींद्र आंबोळकर उर्फ बबलू याच्यावर ३७६ प्रमाणे दि.४ मार्च रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ही घटना दि. १७/३/२०१८ ते २२/२/२०२४ या कालावधीत घडली आहे.या घटनेबाबत संबंधित पिडीत महिलेने दि. ४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीत तीने म्हटले म्हटले आहे की, सन २०१८ मध्ये माझ्या फेसबुक अकाउंट वर स्वप्निल रवींद्र आंबोळकर याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ती फ्रेंड रिक्वेस्ट मी एक्सेप्ट केली. तेव्हापासून स्वप्निल आंबोळकर याच्याशी माझे फेसबुक वर बोलणे सुरू झाले. त्याने मला तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्याशी लग्न करेल असे मुजकूर फेसबुकवर पाठवले होते.मी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर तो सातत्याने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असल्याने मी त्याला ब्लॉक करून टाकले. व सन 2021 मध्ये माझा मोबाईल बदलला. त्यानंतर स्वप्नील आंबोळकर याने पुन्हा माझ्या मोबाईलवर कॉल करण्यास सुरुवात करून तू माझ्याशी लग्न कर .माझे तुझ्यावर प्रेम आहे असा मेसेज टाकला.असा सन २०२२ फेब्रुवारी महिन्यात त्याने आपल्या लांजा तालुक्यातील साटवली येथील घरी बोलावले .मी एसटीने साटवली येथे त्यांच्या घरी गेले.रात्री त्याच्या घरी झोपलेले असताना त्याने रात्रीच्या वेळेस माझ्या रूम मध्ये येऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रास्तावित केले मी त्याला प्रतिकार केला असता त्याने तू कोणाला घरात सांगू नको. मी झालेला प्रकार माझ्या आईला सांगतो. असे सांगितले त्यानंतर मी सकाळी उठून माझ्या घरी गेले. त्यानंतर तो मला सारखा फोन करून आय लव यू बायको, गुड मॉर्निंग असे मेसेज करत होता. सन ऑक्टोबर 2023 मध्ये स्वप्निल आंबोळकर याने फोन करून तू माझ्या घरी ये असे गोड बोल मला घरी घरी बोलावून घेतले. त्यावेळी मी दोन दिवस तिथे थांबले होते. त्यावेळी त्याने घरातील भाऊ, आई यांना माझी मैत्रीण अशी ओळख करून दिली.त्यानंतर पुन्हा त्याने या दिवशी तु माझी बायको आहेस, व लग्नाचे आमिष दाखवून त्याने आपल्याशी जबरदस्तीने संबंध ठेवलेस्वप्निल आंबोळकर याने आपण एप्रिल २०२४ मध्ये लग्न करूया असे मला सांगितले होते.त्यानंतर त्याने माझ्याशी फोनवर बोलणे बंद केले. माझ्याशी बोलणे टाळू लागला. लग्नाचे विचारले असता मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, तू कोणीतरी चांगला मुलगा बघून लग्न कर असे सांगून मी माझा फोन बंद केला व माझी फसवणूक केली असे तक्रारीत म्हटले आहे.www.konkantoday.com