आमदार रवींद्र वायकर यांनी रविवारी शिंदे गटात प्रवेश केला
महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम होण्याआधीच घटक पक्षांत पडझड सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी रविवारी सायंकाळी शिंदे गटात प्रवेश केला.ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे.
ठाकरे गटाचेच दुसरे नेते आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमधील सभेत बोलताना पक्षात मिळणाऱ्या वागणुकीवरून नाराजी व्यक्त केली आहे. अशात ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काठावर आलेल्या आपल्या नेत्यांना आवरायचे कसे याचा मोठा पेच महाविकास आघाडीतील पक्षनेतृत्वासमोर निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे आदल्याच दिवशी गोरेगाव येथे ठाकरे यांचे वायकर यांनी स्वागत केले होते. दुसऱ्या दिवशीच त्यांचे पक्षांतर झाले. हा पक्षप्रवेश होण्याआधी मुंबई महापालिकेने त्यांच्याविरोधातील आरोप मागे घेतले.
www.konkantoday.com