
सूर्यघरसाठी १ हजाराहून अधिक नोंदणी
खेडमध्ये शहरासह ग्रामीण भागातील १ हजाराहून अधिक कुटुंबप्रमुखांनी सुर्यघर बनवण्यासाठी नोंदणी केली आहे. तालुक्यातील २०० पोस्टमन यासाठी सर्व्हे करून स्मार्ट फोनद्वारे नोंदणी करत असून या योजनेसाठी तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तालुका डाकघर निरीक्षक क्रिशन गोताड यांनी दिली.घराच्या छतावर सौरऊर्जा वीजनिर्मिती संच बसवून वीज निर्मिती करून स्वतःसाठी मोफत वापरून विजेची गरज पूर्ण करण्यासाठी व अतिरिक्त वीज महावितरणला विकत देवून रोजगार निर्मितीसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये एक ते तीन किलोमीटरसाठी आठ ते दहा चौरस मीटर क्षेत्रात सौरउर्जा संच बसवले जाणार आहेत. हे संच २५ वर्षाहून अधिक चालणार असल्याने तालुक्यातील १ हजाराहून अधिक जणांनी सुर्यघर योजनेसाठी नोंदणी केली आहे.www.konkantoday.com