कशेडी बोगदा पोर्टल खेड येथे बोगद्याचे ठिकाणी एका चालकाचा अचानक फिट येऊन ह्दयविकाराने मृत्यू
_गोवा महामार्गा वरील कशेडी बोगदा नजीक च्या खेड बाजूकडील पोर्टल नजीक एका चालकाचा अचानक फिट येऊन ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना ५ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. कमलेशकुमार सुलेंदर दांगी वय २३ वर्षे मुळ रा. कासियाडीह पो. टिकरा जिल्हा चतरा राज्य झारखंड सध्या रा अनुसया साईड खेड ता खेड जि. रत्नागिरी असे त्या मृत्यू मुखी पडलेल्या चालकाचे नाव आहेकशेडी बोगदा पोर्टल खेड येथे बोगद्याचे ठिकाणी कामगार काम करीत होते सकाळी १०.वा च्या सुमारास चालक कमलेशकुमार सुलेंदर दांगी यास अचानक फिट आल्याने त्यास ग्रामीण रुग्णालय पोलादपुर येथे आणले असता डॉक्टरांनी कमलेशकुमार यास तपासुन तो हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मयत झाला असल्याचे सांगितले म्हणुन पोलादपुर पोलिस ठाणे जि रायगड आमृ रजि ००/ २०२४ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करुन खेड पोलिस ठाण्यात कागदपत्र रोजी प्राप्त झाले वरुन आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहेwww.konkantoday.com