
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड हे होते, गेल्या काही दिवसापासून ते गैरहजर असल्याचे कारण देत त्यांनी अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे.शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा एक मुलगा विद्यमान आमदार आहेत.तर सिद्धेश कदम हे या आधी युवा सेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली यावेळी रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. यामुळे आता त्यांचे पुत्र सिद्धेश कदम यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.महाराष्ट्रात आम्ही शिवसेना-राष्ट्रवादी असो. मोदी-शाह यांच्या कामावर विश्वास ठेऊन सोबत आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही याची दक्षता भाजपाने घेणे आवश्यक आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज्यातील भाजपा नेत्यांना फटकारलं आहे.www.konkantoday.com