काँग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य सतेज पाटील यांचा एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल
एकीकडे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही. आशा सेविका तुटपुंज्या मानधनासाठी संपावर जात आहेत. पण सरकार मात्र प्रसिद्धीला हपापले आहे’, अशा शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य सतेज पाटील यांनी एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. यासाठी पुराव्यादाखल सतेज पाटील यांनी ४ मार्च रोजी राज्य सरकारने काढलेल्या जीआरची प्रतच सोबत जोडली आहे.२० कोटी वर्तमानपत्रांवर तर २०.८ कोटी वृत्तवाहिन्यांवर?आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये सतेज पाटील यांनी यासंदर्भातली आकडेवारी दिली आहे. ‘महाराष्ट्र शासनाने लोकसभेच्या प्रचाराच्या हेतूने एका महिन्याच्या प्रसिद्धीसाठी ‘विशेष माध्यम आराखडा’ मंजूर केला आहे. यामध्ये ३० दिवसांसाठी तब्बल ८४ कोटी रुपये म्हणजेच दिवसाला २ कोटी ८० लाख रुपये माध्यमांतील प्रसिद्धीवर उधळले जाणार आहेत’, अशी पोस्ट सतेज पाटील यांनी केली आहे.पुढे सतेज पाटील यांनी सविस्तर आकडेवारी दिली आहे. ‘या खर्चाची आकडेवारी पुढीलप्रमाणे विभागलेली आहे: वर्तमानपत्रे – २० कोटी रुपये, वृत्तवाहिन्या – २० कोटी ८० लाख रुपये, डिजिटल होर्डिंग-एलईडी – ३७ कोटी ५५ लाख रुपये, सोशल मीडिया – ५ कोटी रुपये’, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.www.konkantoday.com