विष पिऊन डोंगरात तरुणीची आत्महत्या, तरुणीचा मृतदेह खाऊन बिबट्याही मृत्यू
सातारा शहरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन युवतीबद्दल खळबळजनक माहिती समोर आली आहे. या अल्पवयीन युवतीचा सडलेल्या अवस्थेतला मृतदेह अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडला आहे. युवतीचा मृतदेह खाल्लेल्या बिबट्याचाही तिथेच मृत्यू झाला आहे. युवतीच्या मृतदेहाच्या शेजारीच असलेल्या एका झाडावर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे, त्यामुळे या घटनेचं गूढ वाढलं आहे.अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्यापासून काही अंतरावर कड्यावरून अल्पवयीन युवतीने जीवन संपवलं. ही युवती महिन्याभरापासून बेपत्ता झाली होती. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्यावरून डोंगरावर फिरण्यासाठी काही जण गेले होते, तेव्हा युवतीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.मृतदेह आढळल्यानंतर सातारा शहर पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. संबंधित युवती एका महिन्यापूर्वी सातारा शहरातून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्याचाही त्याच ठिकाणी मृत्यू झाल्यामुळे युवतीने विष प्राशन करून आयुष्य संपवलं असावं आणि तिचा मृतदेह बिबट्याने खाल्ला असावा, ज्यामुळे त्याचाही मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.www.konkantoday.com