मंदार एज्युकेशन सोसायटीच्या शैलजा शिंदेना जीवन गौरव पुरस्कार
कोकणात गेली ४२ वर्षे तांत्रिक शिक्षण देणर्या मंदार एज्युकेशन सोसायटीच्या व्हाईस चेअरमन शैलजा राजाराम शिंदे यांच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डसतर्फे जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. दरम्यान, संस्थेच्या विश्वस्त व बीएड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वेदांती विलास सावंत यांना वूमन अचिवर्स ऍवॉर्डने गौरविण्यात आले.रत्नागिरी येथे प्रथमच महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य बुक ऑफ रेकॉर्डस पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.www.konkantoday.com