कामथे रूग्णालयातील आहाराच्या दर्जात सुधारणा करण्याच्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सूचना
कामथे उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना दिल्या जाणार्या आहाराचा दर्जा सुधारा अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी उपाहारगृह व्यवस्थापनाला दिल्या आहेत. त्यांनी सोमवारी रूग्णालयाला भेट देवून पाहणी केली. कामथे उपजिल्हा रूग्णालयात अनेक रूग्णांना दाखल करून घेत त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यामुळे अशा रूग्णांना शासनाकडून मोफत आहार दिला जातो. याचा ठेका मुंबईतील एका कंपनीने घेतला असून या कंपनीने महाडीक नामक व्यक्तीला आहार बनवण्याचे काम दिले आहे. मात्र रूग्णांना दिला जाणारा आहार चांगला नसतो, तीन पोळ्यांऐवजी दोनच पोळ्या दिल्या जातात. अंडी, फळे दिली जातच नाहीत. दूध देण्यास नकार दिला जातो. अशा अनेक तक्रारी रूग्ण, त्यांचे नातेवाईक व लोकप्रतिनिधींकडून होताना दिसतात. www.konkantoday.com