कर्णबधीर दिव्यांग मुलांच्या मागण्यांसाठी शासनाकडे मुलांच्या पालकांचे साकडे
मुकबधीरत्वाच शीघ्र निदान होण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशासेविका, आरोग्यसेविका यांचे प्रशिक्षण व्हावे, श्रवणयंत्र देखभाल दुरूस्ती सेवा तत्काळ मिळाव्या, श्रवणयंत्रांची रक्कम ५ टक्के दिव्यांग राखीव निधीतून देताना जिल्हा परिषद, नगर परिषदेने रक्कम नियंत्रित करू नये, अशा विविध मागण्या कर्णबधीर दिव्यांग मुलांच्या पालकांनी आस्था सोशल फाऊंडेशन रत्नागिरीमध्ये एकत्र येवून पत्रकार परिषदेत मांडल्या.रत्नागिरीतील आस्था या संस्थेत ३ मार्च रोजी जागतिक, श्रवणदिनाचा कार्यक्रम पार पडला. या संदर्भात आयोजित कार्यक्रम व पत्रकार परिषदेला कर्णबधीर दिव्यांग मुले व त्यांचे पालक, आस्थाच्या सचिव सुरेखा पाथरे, आस्था दिव्यांग हेल्पलाईनचे जिल्हा समन्वयक संकेत चाळके व आस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी या दिनानिमित्ताने कर्णबधीर दिव्यांग मुलांच्या पालकांनी आस्था सोशल फाऊंडेशन रत्नागिरीमध्ये एकत्र आले होते. www.konkantoday.com