समूह शाळा (क्लस्टर शाळा) विकसित करण्यासाठी विविध जिल्ह्यांमधून सुमारे सातशे प्रस्ताव
कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करून समूह शाळा (क्लस्टर शाळा) विकसित करण्यासाठी विविध जिल्ह्यांमधून सुमारे सातशे प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे आले आहेत. सुमारे १९०० शाळांचे समायोजन करून या समूह शाळा विकसित करण्याचा प्रस्ताव आल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.राज्यातील शून्य ते वीस विद्यार्थी पटसंख्येच्या सरकारी शाळांचे समायोजन करून नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ आणि पुणे जिल्ह्यातील पानशेत या समूह शाळांच्या धर्तीवर राज्यात समूह शाळा विकसित करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत मागवले होते. त्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंतची मुदत दिली होती.www.konkantoday.com