महावितरणच्या कंत्राटी कर्मचार्यांचे बेमुदत कामबंदमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
महावितरणच्या कंत्राटी कर्मचार्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी ४८ तासांची मुदत देवूनही त्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर व वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.www.konkantoday.com