
बेदरकारपणे बस चालवुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणा-या ‘त्या’ S T चालकावर गुन्हा दाखल
देवरुखहुन संगमेश्वर कडे करजुवे वस्तीची गाडी घेऊन येणारा बस चालक अमित आपटे याच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरुख आगाराची देवरुख संगमेश्वर ही बस घेऊन चालक अमित आपटे हा संगमेश्वरला येत होता. लोवले येथे आला असता त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली होती .यामध्ये १३ जण जखमी झाले होते . संगमेश्वर कोल्हापूर राज्य मार्गावर बेदरकारपणे , वेगवान गाडी चालवून प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या चालकावर अखेर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास संगमेश्वर पोलीस शिंदे करीत आहेत.www.konkantoday.com