पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी : हिंदू जनजागृती समितीची मागणी

रत्नागिरी, ५ मार्च – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पूजनीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर मनमाड (जिल्हा नाशिक) येथे २९ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३०च्या सुमारास स्वतःला आंबेडकरवादी म्हणणाऱ्या काही माथेफिरूंनी त्यांची गाडी अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली, पायातील बूट व अन्य तत्सम वस्तूंचा उपयोग करून गाडीच्या काचा फोडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा भ्याड हल्ला करणाऱ्यांचा आणि यामागील मास्टर माईंड शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याविषयी आज रत्नागिरी येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री गणेश गायकवाड, सुशील कदम, गौरव पावसकर, संजय जोशी, अनिल वीर, अंकिता राजेशिर्के, सोहम खानविलकर, रमण पाध्ये, साहिल पाटील, जीवन जाधव, श्रीकांत जोशी, सचिन खेत्री, अरुण जयस्वाल, सुशील ऐवळे, गणेश घडशी, मालप आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूजनीय संभाजीराव भिडेगुरुजी म्हणजे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असून त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील अनेक युवकांना दिशा देऊन त्यांना देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील केलेले आहे. त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे अनेक युवक राष्ट्र अन् धर्म रक्षणासाठी कृतीशील झालेले आहेत, तसेच व्यसनांपासून दूर झालेले आहेत. त्यामुळे पूज्य संभाजीराव भिडे गुरुजी हे अनेक युवकांचे प्रेरणास्थान आहेत. असे असताना पूजनीय गुरुजींवर वेगवेगळ्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून आक्रमणे करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा, त्यांच्या गाड्या अडवण्याचे प्रकार होत आहेत. पूजनीय गुरुजींसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वावर तसेच वयोवृद्ध व्यक्तीवर अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणे, हे निषेधार्य आहे. या घटनेमागे जे दोषी आहेत त्यांना पकडून त्वरित त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या घटनेमागचा मास्टरमाईंड शोधून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा पूर्वनियोजित कट, तर नाही ना याची चौकशी करावी, तसेच पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना लवकरात लवकर सुरक्षा पुरवण्यात यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.*आपला विश्वासू,*संजय जोशीहिंदु जनजागृती समितीकरिता (संपर्क क्रमांक : 8983265759 )www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button