रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडून देऊनही काहीही काम केलेले नाही, अशांना आपल्याला येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवायचा आहे-गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडून देऊनही काहीही काम केलेले नाही, अशांना आपल्याला येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवायचा आहे. त्यासाठी आम्हा सर्वांची एकी महत्त्वाची आहे.गेल्या दहा वर्षांत त्यांनी आपल्याला त्रास दिला आहे, आता त्यांना धडा शिकवायचा आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे क्लस्टर प्रमुख आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.भाजपच्या दक्षिण रत्नागिरीतर्फे रविवारी शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात भाजप कार्यकर्ता संमेलनाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या संमेलनात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी शिंदे गट आणि अजित पवार गट यांना बरोबर घेऊन जायचे आहे, असे स्पष्ट केले. या लोकसभा मतदारसंघाचा विकास करावयाचा असेल तर मोदींनी दिलेले प्रकल्प, योेजना येथे राबवायला पाहिजेत. ते कोणी राबविले नाहीत, या विकासाच्या आड कोण आले, हे लोकांसमोर सांगायला पाहिजे, असेही ते म्हणाले.मोदींनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघाला प्रकल्प दिलेला आहे. मोदी देत असतानाही येथील खासदाराने काय काम केले. प्रकल्प का आणला नाही, अशी त्यांना विचारणा करा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.www.konkantoday.com