अर्ध्या शहरासह मिरजोळी परिसराचा पाणीप्रश्न गंभीर
वाशिष्ठी नदीत पाणीच नसल्याने सध्या अर्ध्या शहरासह मिरजोळी, कोंढे, शिरळ गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खाडीचे पाणी येत असल्याने सध्या या सर्वांना खारट, मचूळ व गढूळ पाणी मिळत आहे. यामुळे सर्वांचे हाल होत आहेत.वाशिष्ठी नदी ही वीजनिर्मितीनंतर सोडल्या जाणार्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे वीजनिर्मितीचे होणारे कमी जास्तीचे प्रमाण लक्षात घेता सध्या वाशिष्ठी नदीत तितकेसे पाणी सोडले जात नाही. त्यामुळे अनेकदा नदी कोरडी पडल्याचे चित्र दिसून येते. असा प्रकार गेल्या ८ दिवसांपासुन सुरू आहे. याचा परिणाम म्हणून भरतीला खाडीचे पाणी कोंढे, शिरळ, मिरजोळी व अर्ध्या शहराला पाणीपुरवठा करणार्या गोवळकोट जॅकवेलपर्यंत येते. याचवेळी पाण्याची उचल करून ते नागरिकांना दिले जात असल्याने गेल्या काही दिवसांपासून मचूळ खारट व गढूळ पाणी सर्वांना मिळत असल्याचे बोलले जात आहे. www.konkantoday.com