मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासोबतच* *मुंबई-सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार-मुख्यमंत्री

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासोबतच मुंबई-सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीकोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर ‘कोकण विकास प्राधिकरण’ स्थापन केले असून या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, शनिवारी आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव तसेच राज्यातील बळीराजावर ओढवलेलं अवकाळी पावसाचे संकट दूर कर एवढेच मागणे आईच्या चरणी मागितल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी किशोर तावडे आदी उपस्थित होते आंगणेवाडीतील या आई भराडीदेवीच्या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. त्यांच्यासाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी नक्की देण्यात येईल, त्यासाठी मंदिर परिसराच्या विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button