कोकण गोव्यामध्ये आज तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. काल विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. तर पुण्यात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान आज देखील राज्यात वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज एक तीव्र पश्चिमी विक्षोभ पश्चिमेकडून उत्तर भारतावर येत आहे. त्याबरोबर जोडलेली एक द्रोनिका रेषा अरबी समुद्र पर्यंत जात आहेत. त्यामुळे अरबी समुद्राकडून आर्द्रता मिळाल्यामुळे उत्तर व मध्य भारतातील सिस्टीमची तीव्रता वाढत आहे. या व्यतिरिक्त नैऋत्य राजस्थानामध्ये वाऱ्याची एक चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरातून प्रती चक्रवाती वाऱ्यांमुळे राज्यात आग्नेय वाऱ्यांबरोबर सुद्धा आर्द्रता येत आहे. यामुळे कोकण गोव्यामध्ये आज तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार आहे.मध्य महाराष्ट्रात पुढील ४८ तासात मेघगर्जना व विजांच्या कडकडाट सहित तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि गारा देखील पडण्याची शक्यता आहे. www.konkantoday.com